लेख

खवल्या मांजर: कोरोना विषाणूचा दरम्यानचा वाहक?

खवल्या मांजर: कोरोना विषाणूचा दरम्यानचा वाहक?

- [field_author]

संशोधकांनी दक्षिण चीनमधून मिळवलेल्या खवल्या मांजरांच्या गोठवलेल्या ऊतींच्या नमुन्यांमधून सार्स-कोवी-2शी संबंधित कोरोनाविषाणू ओळखून काढले आहेत. ज्यांना सार्स-कोवी-2 संबंधित कोरोनाविषाणूंचा संसर्ग होऊ शकतो असे ज्ञात सस्तन प्राणी खवली मांजरे आणि वटवाघळे हे दोनच आहेत, आणि खवली मांजरे विषाणूच्या प्रसारात मध्यस्थ आश्रयी असू शकतात असा अंदाज आहे.

नवीन कोरोनाविषाणूच्या जीनोमपासून आपण काय शिकू शकतो?

नवीन कोरोनाविषाणूच्या जीनोमपासून आपण काय शिकू शकतो?

- [field_author]

या लेखात, जीनोमच्या अनुक्रमांमुळे नवीन कोरोनाविषाणूचा उगम कोठे झाला, या विषाणूवर लस तयार करता येईल का अशा काही प्रश्नांची उकल होण्याबाबत वैज्ञानिकांना मदत कशी झाली, याचा खुलासा केलेला आहे.

नवीन कोरोनाविषाणू उत्क्रांत होत आहे का?: भाग २

नवीन कोरोनाविषाणू उत्क्रांत होत आहे का?: भाग २

- [field_author]

‘नवीन कोरोनाविषाणू उत्क्रांत होत आहे का?: भाग १’ या लेखात जगात सार्स-कोवी-2 च्या जीनोममधील उत्परिवर्तनांसंबंधी केलेल्या वेगवेगळ्या अभ्यासांविषयी माहिती होती, तर या दुसऱ्या भागात, भारतात या विषाणूच्या जीनोमच्या अनुक्रमांच्या अभ्यासांमधील काही कळीच्या निष्कर्षांविषयी चर्चा केलेली आहे.

नवीन कोरोनाविषाणू उत्क्रांत होत आहे का? : भाग १

नवीन कोरोनाविषाणू उत्क्रांत होत आहे का? : भाग १

- [field_author]

विषाणूंच्या संसर्गावर उपचार करणे का कठीण आहे, यामागील एक महत्त्वाचे कारण म्हणजे अनेक विषाणूंमध्ये होणारे उत्परिवर्तन. याद्वारे विषाणूंचा काही वेळा मनुष्याच्या रोगप्रतिक्षम संस्थेपासून बचाव होऊ शकतो, तसेच त्यांच्यात औषधांना रोध करण्याची शक्ती विकसित होऊ शकते. या लेखात, कोविड-19 चा कारक विषाणू सार्स-कोवी-2च्या जीनोममध्ये जगात जी उत्परिवर्तने घडून आली आहेत, त्यांसंबंधी वैज्ञानिकांनी संकलित केलेल्या माहितीवर नजर टाकलेली आहे.

कोविड-19 च्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठी डिजिटल संपर्क यंत्रणेचा वापर

कोविड-19 च्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठी डिजिटल संपर्क यंत्रणेचा वापर

- [field_author]

युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड येथील संशोधकांनी सार्स-कोवी-2 या विषाणूचा प्रसार ज्या चार मार्गांनी होतो त्यांची तुलना केली आहे. तसेच या प्रसारावर ताबा मिळविण्यासाठी प्रत्येक बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना शोधण्यासाठी डिजीटल संपर्क पद्धतीवर आधारित मोबाइल ॲप अधिक प्रभावी ठरू शकते, असे सुचविले आहे.

क्रिस्पर तंत्रज्ञान: कोविड-19 विरुद्ध जनुकीय आघात

क्रिस्पर तंत्रज्ञान: कोविड-19 विरुद्ध जनुकीय आघात

- [field_author]

क्रिस्पर हे जनुक-संपादन तंत्रज्ञान वापरून नवीन कोरोनाविषाणूची क्रियाशीलता कशी रोखता येते, अशा नवीन अभ्यासाबाबत या लेखात माहिती आहे.

कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी नाविन्यपूर्ण संशोधने

कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी नाविन्यपूर्ण संशोधने

- [field_author]

कोविड-19 च्या महामारीमुळे आपल्या आरोग्यसेवांमध्ये मोठी उलथापालथ झाली असून अनेक भारतीय तंत्रज्ञ या आव्हानांशी सामना करीत आहेत. याविरुद्ध भारतीय संस्थांमधील तसेच उद्योगांमधील संशोधकांनी काही नवीन तंत्रे व स्वदेशी पर्याय शोधले आहेत, जे सध्या विकासप्रक्रियेच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आहेत, त्यासंबंधीची माहिती वंशिका सिंग यांनी या लेखात दिली आहे.

कोविड-19 प्रतिद्रव्यांची चाचणी

कोविड-19 प्रतिद्रव्यांची चाचणी

- [field_author]

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरू येथील डिपार्टमेंट ऑफ केमिकल इंजिनिअरींग मधील सहाध्यायी प्राध्यापक राहूल रॉय यांनी प्रतिद्रव्य चाचण्यांचे कार्य कसे घडते आणि कोविड-19 महामारीच्या संदर्भात या चाचण्या का उपयुक्त आहेत, यासंबंधी पुढे चर्चा केलेली आहे.

कोरोना-19 महामारी रोखण्यात विज्ञान आणि वैज्ञानिकांची भूमिका (भाग २)

कोरोना-19 महामारी रोखण्यात विज्ञान आणि वैज्ञानिकांची भूमिका (भाग २)

- [field_author]

कोविड-19 महामारीसारखी वैश्विक समस्या सोडवण्यासाठी समाज वैज्ञानिकदृष्ट्या उत्कर्ष होण्याची गरज प्रकर्षाने पुढे आलेली आहे. कौशिक विश्वास हे बोस इन्स्टिट्यूट, कोलकाता येथील डिव्हिजन ऑफ मोलेक्युलर मेडिसीन मध्ये सहाध्यायी प्राध्यापक आहेत. वेगाने पसरणाऱ्या या रोगाला प्रतिबंध घालण्यासाठी आणि उपचारासंबंधी धोरणे आखण्यासाठी नवनवीन वैज्ञानिक पद्धती कशा उपयुक्त ठरतील, यासंबंधी त्यांनी या दोन भागांच्या लेखांत चर्चा केलेली आहे.

कोरोना-19 महामारी रोखण्यात विज्ञान आणि वैज्ञानिकांची भूमिका (भाग १)

मास्कचा इतिहास आणि त्याच्या वापरामागील विज्ञान

मास्कचा इतिहास आणि त्याच्या वापरामागील विज्ञान

- [field_author]

कोविड-19 रोगाविरुद्धच्या लढाईत आपल्या मित्रपक्षांमध्ये मास्क हे आपले साधे, स्वस्त आणि सर्वांत प्रभावी असे एक साथीदार आहेत. या लेखात, प्लेग तसेच इतर साथींचा प्रसार रोखण्यासाठी मास्कच्या वापराचा मागील शंभर वर्षांचा इतिहास सांगितला आहे, तसेच सार्वजनिक आरोग्यासाठी मास्क एक महत्त्वाचे साधन ठरण्यामागे काय विज्ञान आहे, याचेही विवेचन आहे.

कोविड-19: काही गैरसमजांविषयी स्पष्टीकरण

कोविड-19: काही गैरसमजांविषयी स्पष्टीकरण

- [field_author]

कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी किंवा त्यावर उपचार करण्यासाठी ‘कलिली (कोलॉइडी) चांदी’ किंवा ‘बाष्पनशील तेले’ अशा घरगुती उपायांसंबंधी अयोग्य माहितीचा प्रसार समाज माध्यमांवर पाहात आहोत. यापैकी काही प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी आम्ही अशोका विद्यापीठ (सोनीपत) आणि इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सेस (चेन्नई) येथील भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांचे प्राध्यापक गौतम मेनन यांना विनंती केली. त्यांनी केलेल्या कोविड-19 संबंधी काही महत्त्वाच्या खुलाशातून पुढील प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळतील.