लेख

नवीन कोरोनाविषाणूच्या जीनोमपासून आपण काय शिकू शकतो?

नवीन कोरोनाविषाणूच्या जीनोमपासून आपण काय शिकू शकतो?

- [field_author]

या लेखात, जीनोमच्या अनुक्रमांमुळे नवीन कोरोनाविषाणूचा उगम कोठे झाला, या विषाणूवर लस तयार करता येईल का अशा काही प्रश्नांची उकल होण्याबाबत वैज्ञानिकांना मदत कशी झाली, याचा खुलासा केलेला आहे.

नवीन कोरोनाविषाणू उत्क्रांत होत आहे का?: भाग २

नवीन कोरोनाविषाणू उत्क्रांत होत आहे का?: भाग २

- [field_author]

‘नवीन कोरोनाविषाणू उत्क्रांत होत आहे का?: भाग १’ या लेखात जगात सार्स-कोवी-2 च्या जीनोममधील उत्परिवर्तनांसंबंधी केलेल्या वेगवेगळ्या अभ्यासांविषयी माहिती होती, तर या दुसऱ्या भागात, भारतात या विषाणूच्या जीनोमच्या अनुक्रमांच्या अभ्यासांमधील काही कळीच्या निष्कर्षांविषयी चर्चा केलेली आहे.

नवीन कोरोनाविषाणू उत्क्रांत होत आहे का? : भाग १

नवीन कोरोनाविषाणू उत्क्रांत होत आहे का? : भाग १

- [field_author]

विषाणूंच्या संसर्गावर उपचार करणे का कठीण आहे, यामागील एक महत्त्वाचे कारण म्हणजे अनेक विषाणूंमध्ये होणारे उत्परिवर्तन. याद्वारे विषाणूंचा काही वेळा मनुष्याच्या रोगप्रतिक्षम संस्थेपासून बचाव होऊ शकतो, तसेच त्यांच्यात औषधांना रोध करण्याची शक्ती विकसित होऊ शकते. या लेखात, कोविड-19 चा कारक विषाणू सार्स-कोवी-2च्या जीनोममध्ये जगात जी उत्परिवर्तने घडून आली आहेत, त्यांसंबंधी वैज्ञानिकांनी संकलित केलेल्या माहितीवर नजर टाकलेली आहे.

कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी नाविन्यपूर्ण संशोधने

कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी नाविन्यपूर्ण संशोधने

- [field_author]

कोविड-19 च्या महामारीमुळे आपल्या आरोग्यसेवांमध्ये मोठी उलथापालथ झाली असून अनेक भारतीय तंत्रज्ञ या आव्हानांशी सामना करीत आहेत. याविरुद्ध भारतीय संस्थांमधील तसेच उद्योगांमधील संशोधकांनी काही नवीन तंत्रे व स्वदेशी पर्याय शोधले आहेत, जे सध्या विकासप्रक्रियेच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आहेत, त्यासंबंधीची माहिती वंशिका सिंग यांनी या लेखात दिली आहे.

कोरोना-19 महामारी रोखण्यात विज्ञान आणि वैज्ञानिकांची भूमिका (भाग २)

कोरोना-19 महामारी रोखण्यात विज्ञान आणि वैज्ञानिकांची भूमिका (भाग २)

- [field_author]

कोविड-19 महामारीसारखी वैश्विक समस्या सोडवण्यासाठी समाज वैज्ञानिकदृष्ट्या उत्कर्ष होण्याची गरज प्रकर्षाने पुढे आलेली आहे. कौशिक विश्वास हे बोस इन्स्टिट्यूट, कोलकाता येथील डिव्हिजन ऑफ मोलेक्युलर मेडिसीन मध्ये सहाध्यायी प्राध्यापक आहेत. वेगाने पसरणाऱ्या या रोगाला प्रतिबंध घालण्यासाठी आणि उपचारासंबंधी धोरणे आखण्यासाठी नवनवीन वैज्ञानिक पद्धती कशा उपयुक्त ठरतील, यासंबंधी त्यांनी या दोन भागांच्या लेखांत चर्चा केलेली आहे.

कोरोना-19 महामारी रोखण्यात विज्ञान आणि वैज्ञानिकांची भूमिका (भाग १)

मास्कचा इतिहास आणि त्याच्या वापरामागील विज्ञान

मास्कचा इतिहास आणि त्याच्या वापरामागील विज्ञान

- [field_author]

कोविड-19 रोगाविरुद्धच्या लढाईत आपल्या मित्रपक्षांमध्ये मास्क हे आपले साधे, स्वस्त आणि सर्वांत प्रभावी असे एक साथीदार आहेत. या लेखात, प्लेग तसेच इतर साथींचा प्रसार रोखण्यासाठी मास्कच्या वापराचा मागील शंभर वर्षांचा इतिहास सांगितला आहे, तसेच सार्वजनिक आरोग्यासाठी मास्क एक महत्त्वाचे साधन ठरण्यामागे काय विज्ञान आहे, याचेही विवेचन आहे.

सामान्यपणे संशयित न वाटणारे कोविड-19 चे अप्रकट वाहक

सामान्यपणे संशयित न वाटणारे कोविड-19 चे अप्रकट वाहक

- [field_author]

तुम्ही पाहिले असेल, की काही रहस्यमय चित्रपटांमध्ये किंवा कथांमध्ये ज्या पात्रावर सर्वांत कमी संशय असतो तेच पात्र गुन्ह्यांची सूत्रधार असते. कोविड-19 महामारीदेखील अशी सारखीच परिस्थिती दाखवित आहे; काही बाधित व्यक्तींमध्ये रोगाची लक्षणे दिसून येत नाहीत, परंतु त्यांच्याकडून नकळतपणे इतरांना विषाणूचा संसर्ग होत आहे. वैज्ञानिकांना तसे साथरोगतज्ज्ञांना असा संशय आहे की, या बाधित परंतु लक्षणरहित व्यक्ती महामारीच्या भडक्यात तेल टाकू शकतात. अशा लक्षणरहित व्यक्तींना ओळखले आणि त्यांचा मागोवा घेतला, तर पुढच्या काळासाठी रोगाच्या चाचण्यांसंबंधी आणि प्रतिबंधित क्षेत्रांसंबंधी धोरणे ठरवता येतील.

कोविड -19 रोग, बीसीजी लस आणि रोगप्रतिक्षमता

कोविड -19 रोग, बीसीजी लस आणि रोगप्रतिक्षमता

- [field_author]

या लेखात, बीसीजी लस आणि जन्मजात प्रतिक्षम संस्था यांच्यात कोणकोणते दुवे असतात आणि ही लस शरीराला कोविड-19 रोगासारख्या अनेक संसर्गजन्य रोगांविरुद्ध लढायला कशी मदत करू शकते याचे वर्णन केलेले आहे.

कोरोनाविषाणूंचे S-प्रथिन: मुकुटातल्या रत्नाचा शोध

कोरोनाविषाणूंचे S-प्रथिन: मुकुटातल्या रत्नाचा शोध

- [field_author]

नवीन कोरोनाविषाणू त्यांच्या पृष्ठभागावर असलेल्या S-प्रथिनांचा वापर करून आपल्या पेशीत प्रवेश करतात. या प्रथिनाची संरचना उलगडल्यामुळे या विषाणूचा प्रसार कसा होतो, तसेच औषधे आणि लसनिर्मिती कोणत्या दिशेने करावी, हे शास्त्रज्ञांना चांगल्या प्रकारे समजण्यास मदत झाली आहे.

घंटाघरातील वटवाघळे: मित्र की शत्रू?

घंटाघरातील वटवाघळे: मित्र की शत्रू?

- [field_author]

या लेखात वटवाघळे आणि आपण त्यांची काळजी का घ्यायला हवी याबाबत लेखकांनी एक संतुलित आढावा घेतला आहे. आपल्या परिसंस्थेमध्ये परागीभवन, कीटकनियंत्रण या कार्यांत वटवाघळे कोणती भूमिका बजावतात आणि विषाणूंना आश्रय कसे देतात याची चर्चा केलेली आहे.

कोविड-19: तुमच्या शरीरात काय घडते?

कोविड-19: तुमच्या शरीरात काय घडते?

- [field_author]

जेव्हा नवीन कोरोनाविषाणू मानवी पेशीला बाधित करतो तेव्हा काय होते? कोविड-19 ची लक्षणे का दिसून येतात आणि शरीर त्यांना कसा प्रतिसाद देते?