सेवा आणि मदतकेंद्रांची माहिती

 • परिवर्तन हे व्यक्तीमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणारे समुपदेशन, प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र आहे. सोमवार से शुक्रवार या दिवशी सकाळी १० ते रात्री १० या वेळेत तुम्ही समुपदेशनासाठी संपर्क करू शकता. संपर्क 7676602602. ई-मेल – parivarthanblr@gmail.com, संकेतस्थळ | www.parivarthan.org

 • स्नेह फाउंडेशन इंडिया ही 24×7 चालू असलेली हेल्पलाईन सेवा आहे. निराश, अगतिक झालेल्या व्यक्तींना तसेच आत्महत्या रोखण्यासाठी ही संस्था भावनात्मक आधार देते. संपर्क - +91 4424640050, संकेतस्थळ | https://snehaindia.org/

 • वांद्रेवाला फाऊंडेशन फॉर मेंटल हेल्थ या उपक्रमाद्वारे मानसिकदृष्ट्या रुग्ण किंवा भावनिकदृष्ट्या निराश झालेल्या व्यक्तींना सेवा पुरवली जाते. तुम्ही त्यांच्या प्रशिक्षित तज्ज्ञांशी हॉटलाईनद्वारे चर्चा करू शकता. संपर्क- 18602662345. संकेतस्थळ | https://www.vandrevalafoundation.com

 • सहाय हेल्पलाईन फॉर सुसायडल प्रिव्हेन्शन ॲन्ड इमोशनल डिस्ट्रेस ही संस्था समर्पित स्वयंसेवकाद्वारे चालवली जाते. ही संस्था समाजातील सर्व व्यक्तींच्या जीवनातील वेगवेगळ्या टप्प्यांवर ताण-तणावाच्या काळात भावनिक आधार देण्याचे कार्य करते. संपर्क- 080-25497777. संकेतस्थळ | https://www.facebook.com/Sahai-Helpline-91-80-25497777-247442978655084

 • लाईफलाईन ही कोलकाता (पश्चिम बंगाल) येथील स्वयंसेवी आणि सेवाभावी संस्था आत्महत्या रोखण्याच्या क्षेत्रात काम करते. निराश, अगतिक झालेल्या व्यक्तींना आणि आत्महत्या रोखण्यासाठी ही संस्था दूरध्वनीद्वारे मोफत आणि खाजगी सेवा देते. संपर्क – +91 33 2474 4704, +91 33 2474 5886, 2474 5255, संकेतस्थळ | https://lifelinefoundation.co.in/

 • आसरा ही संस्था नैराश्य आलेल्या व्यक्तींसाठी तसेच आत्महत्या रोखण्यासाठी स्वयंसेवी, व्यावसायिक तसेच खाजगी स्वरूपाची काळजी घेते आणि सेवा देते. त्यांची हेल्पलाईन सोमवार ते शनिवार या दिवशी दुपारी 2:00 ते रात्री 8:00 या वेळेत चालू असतात. संपर्क – 011 2338 9090 | www.aasra.info

 • सुमैत्री ही दिल्ली-स्थित स्वयंसेवी संस्था असून ही संस्था निराश, ताणतणावाखाली असलेल्या किंवा भावनिक आधाराची गरज असलेल्या व्यक्तींसाठी संकट निरसनासाठी केंद्र चालविते. त्यांची हेल्पलाईन सोमवार ते शुक्रवार या दिवशी दु. 2:00 ते रात्री 10:00 या वेळेत आणि शनिवार-रविवारी स. 10:00 ते रात्री 10:00 या वेळेत चालू असतात. संपर्क - 01123389090

 • Now & Me या मंचावर आपले अनुभव गुप्तपणे नोंदवा. संकेतस्थळ | https://nowandme.com/

 • संजीवनी सोसायटी फॉर मेंटल हेल्थ ही संस्था नैराश्य, अगतिकता आणि इतर मानसिक समस्या असलेल्या व्यक्तींचे मोफत समूपदेशन करते. संपर्क – 011-24311918 संकेतस्थळ | https://www.facebook.com/SanjiviniSociety/

 • स्नेही ही संस्था मुख्यत: बालके आणि पौगंडावस्थेतील मुलामुलींना मानसिक - सामाजिक आधारासाठी, तसेच मानसिक स्वास्थासाठी सेवा देते आणि त्यांच्या हक्कांसाठी कार्य करते. संपर्क - 011-26521494

 • फोर्टिस स्ट्रेस हेल्पलाइन मानसिक स्वास्थ नीट राखण्यासाठी 24×7 सेवा देते. संपर्क - +918376804102

 • रोशनी ट्रस्ट ही स्वयंसेवी संस्था मानवी जीवन अनमोल आहे, असे मानते. रोशनी हेल्पलाइन याच संस्थेचा उपक्रम आहे. मागील 20 वर्ष रोशनी हेल्पलाइन नैराश्य आलेल्या व्यक्तींसाठी आणि आत्महत्या रोखण्यासाठी भावनिक आधार देण्याची मोफत सेवा देत आहे. हेल्पलाईन: सोमवार ते शनिवार – सकाळी 11:00 ते रात्री 9:00. संपर्क- +91 40 6620 2000, +91 40 6620 2001, संकेतस्थळ | https://roshni-trust.org/

 • काश्मीर लाइफलाईन ही संस्था श्रीनगर आणि काश्मीर खोऱ्यातील भावनिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या तणावाखाली असलेल्या व्यक्तींसाठी समूपदेशन आणि त्यांचे मानसिक स्वास्थ नीट राखण्यासाठी औषधोपचार करते. त्यांची हेल्पलाइन रविवार ते गुरुवार या दिवशी सकाळी 10:00 ते संध्याकाळी 5:00 या वेळेत चालू असते. संपर्क - 1800 180 7020, संकेतस्थळ | http://www.kashmirlifeline.org/