स्वास्थ्य

×

Error message

Notice: Undefined offset: 1 in __lambda_func() (line 4 of /var/www/html/covid_gyan/sites/all/modules/views_php/plugins/views/views_php_handler_field.inc(202) : runtime-created function).
कोविड-ज्ञान संकेतस्थळाचा उद्देश कोविड-19 महामारीबाबत सर्वसामान्यांना वैज्ञानिक माहिती देणे आणि सुरक्षित राहण्यासबंधी मार्ग सुचविणे, हे आहेत. यात, आपले आरोग्य चांगले कसे राखावे याकरिता एक विभाग राखून ठेवलेला आहे. या विभागात अनेक स्रोत - आपल्या ताण-तणावावर कशी मात करावी, विलगीकरणाला कसे तोंड द्यावे, महामारीच्या काळात स्वत:ला कसे व्यस्त ठेवावे - इत्यादी उपलब्ध आहेत.
अलीकडेच आम्ही ‘आपले आरोग्य चांगले कसे राखावे’ याकरिता वेगवेगळी पार्श्वभूमी असलेल्या अनेक तज्ज्ञांशी ऑनलाइन मंचावर चर्चा-सत्रे घेतली. हा मंच सुरू करण्यामागे एक लोकसमुदाय निर्माण करणे हा उद्देश असून येथे लोक त्यांचे अनुभव, गोष्टी सांगू शकतात आणि शारीरिक, तसेच मानसिक आरोग्यसंबंधी सकारात्मक चर्चा करू शकतात.
अधिक माहितीसाठी आमच्यासोबत #covidgyan आणि #SundownerSession या समाजमाध्यमांवर संपर्कात रहा.
मानसिक समुपदेशन किंवा उपचारासंबंधी मार्गदर्शन करण्यासाठी हे पर्याय नाहीत, याची कृपया नोंद घ्या. लोकसमुदायासाठी एक मंच उभारणे हा यामागील हेतू आहे. तुम्हाला गरज पडेल तेव्हा तुम्ही प्रशिक्षित मानसिक आरोग्यसेवा देणाऱ्या व्यावसायिकांशी संपर्क साधा, अशी कळकळीची विनंती आपल्याला करीत आहोत.

 

सचित्र माहिती

 

व्हिडिओ / वेबिनार

 

लेख येथे वाचा